Punjabrao Dakh New Havaman Andaj नमस्कार मित्रांनो आपण आजच्या ब्लॉगमध्ये पंजाबराव दख यांच्या हवामान अंदाजाबद्दल माहिती घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर यावेळी चा मान्सून वेळेवर झाला असून, शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील वेळेवर झाले आहेत. काही दिवसांपासून मात्र आता पावसाचा जोर कमी होत असताना दिसत आहे. आता पाऊस थोडा विश्रांती घेण्याच्या मार्गावर आहे. तर चला आपण जाणून घेऊया पंजाबराव दख यांच्या हवामान अंदाजाबद्दलची लेटेस्ट माहिती.
Punjabrao Dakh New Havaman Andaj
जुलै महिन्यामध्ये अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जोरदार हजेरी लावल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी देखील वेळेवर झाल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. तरीही अपेक्षित असा पाऊस झालेला दिसून येत नाहीये. पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. आता हवामान खात्याने देखील राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे असा अंदाज देखील वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या नुसार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र व कोकण परिसरात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने स्पष्ट केला आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Punjabrao Dakh New Havaman Andaj संपूर्ण माहिती
राज्यामध्ये पडणारा कमी जास्त पाऊस यामुळे सगळीकडे चर्चा पसरत आहे. कोण म्हणतोय पावसाचा खंड पडणार तर कोण म्हणतोय जास्त पाऊस पडणार. त्यापूर्वीच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव दख यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये त्यांचे म्हणणे आहे की या हवामानाच्या अंदाजाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्व शेतकऱ्यांना पंजाबराव दख यांनी दर्शवलेला हवामान अंदाज यावर गाढ विश्वास आहे. त्यांनी दर्शवलेल्या हवामान अंदाज कसा असेल याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Punjabrao Dakh New Havaman Andaj नवीन हवामान अंदाज
हवामान खात्यातील ज्येष्ठ तज्ञ पंजाबराव दख यांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार राज्य मधील विविध भागांमध्ये पाऊस सुरळीत सुरूच राहणार असून पावसामध्ये खंड पडणार नाही असे सांगितले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, राज्यामध्ये 8 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसाला देखील सुरुवात होणार आहे. राज्यांमधील जळगाव नाशिक मुंबई धुळे अहमदनगर तसेच पुणे या जवळजवळ 11 जिल्ह्यांमध्ये भाग बदल पाऊस पडू शकतो. त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस देखील पडणार आहे.
Punjabrao Dakh New Havaman Andaj अधिक माहिती
पावसाचा मध्येच पडणारा खंड यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढत चालली आहे, शेतकऱ्यांना दिलासा देत हवामान तज्ञ पंजाबराव दख यांनी सांगितले आहे की, पावसामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नसून महाराष्ट्र मध्ये एकदम 15 ते 20 दिवस पाऊस पडणार आहे.
पंजाबराव उद्योग यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यांमधील काही भागांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी होत चालला आहे. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर देखील कमी होऊ शकतो. त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊस एकदमच बंद होणार नाही. आता पंजाबराव दख यांनी दिलेला हवामान अंदाज किती योग्य दिशेने खरा ठरतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तर मित्रांनो आपण आजच्या या ब्लॉगमध्ये पंजाबराव दख यांनी दिलेल्या हवामान अंदाजाबद्दल माहिती पाहिली. हवामान अंदाज याबद्दल तुम्हालाही काय वाटते ? इथून पुढे पावसाचा जोर असाच राहील की कमी होईल तुम्हाला काय वाटते ? तर मित्रांनो या ब्लॉगमध्ये पाहिलेली पंजाबराव दख यांच्या हवामान अंदाजाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.