Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana Update | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास सुरुवात, पहा सविस्तर माहिती इथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana Update नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ मिळण्याबाबतची माहिती पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्यांना परतफेड करण्यासाठी येणाऱ्या अडचणी चे निवारण व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना सहकार विभागाच्या 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे अंमलात आणली होती. आता लवकरच त्यांना प्रोत्साहन पर लाभ मिळण्यासाठी सुरुवात होणार आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

शेतकरी बांधवांनो सरकार विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेमध्ये आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार शेतकऱ्यांना 5216 कोटी 75 लाख रुपयाचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे.

या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहन पर लाभ अजून मिळालेला नाही. लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. असे आवाहन सरकार विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. संबंधित बँकांनीही अशा खातेदारांशी याबाबत कळवावे असाही निर्देश सहकार भवनाने बँकेंना दिला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
gif

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपला WhatsApp Group जॉइन करा.

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना सहकार विभागाच्या 29 जुलै 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे अंमलात आणली होती.

यामध्ये सन 2017/18, 2018/19 व सन 2019/20 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जासाठी घेतलेली उचल नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार रुपये पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहन पर लाभ यामध्ये मिळणार आहे.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

महा-आयटी मार्फत विकसित संगणीकीय प्रणाली द्वारे या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यामधील विविध बँकांनी सुमारे 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या मुख्य पोर्टलवर सादर केली आहे. यामध्ये त्यापैकी चार लाख 90 हजार कर्ज खाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती इत्यादी कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. जवळजवळ आठ लाख 49 हजार कर्ज खाती 3 वर्षांपैकी केवळ 1 च वर्षाची परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.

15 लाख 44 हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून, प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी 14 लाख 40 हजार कर्ज खात्याने करिता 5,222 कोटी 5 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या सर्वपैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये वितरितही करण्यात आल्याचे सरकार विभागाने कळविले आहे.

तर शेतकरी बांधवांनो आज आपण महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन पर मिळण्यासाठी सुरुवात झाली आहे, ही माहिती सविस्तर पाहिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच शेतीविषयक/योजना विषयक/नोकरीविषयक ताज्या घडामोडी व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटवर भेट देत रहा. माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींशी/कुटुंबीयांशी नक्की शेअर करा.

Leave a Comment