Kukat Palan Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हीही शेती सोबत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीसोबत कुक्कुटपालन व्यवसाय करू शकता. महाराष्ट्र मध्ये कुक्कुट पालना संबंधित अनेक योजना व उपक्रम राबवले जात आहेत. या योजना राबवण्याचे मुख्य उद्देश कुक्कुटपालना सोबत व्यवसायास चालना देणे व राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे आहे. महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी अनुदान दिले जात आहे. तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात या योजनेबद्दलची सविस्तर माहिती.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
शेतकरी बांधवांनो तुम्हीही शेती करता करता सोबत कुकुट पालन व्यवसाय करण्यास इच्छुक असाल व तुम्हालाही कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलात सरकार मार्फत अनुदान मिळवायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुक्कुटपालन फॉर्म उभारण्यासाठी व कुक्कुट उत्पादनाचे उत्पादन वाढवण्यासाठी व्यक्ती सोय सहाय्यता गट व सहकारी संस्था आर्थिक सहाय्य प्रधान करण्यासाठी ही योजना पिल्ले, खाद्य, उपकरणे व इतर खरेदीसाठी सबसिडी देतात.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Kukat Palan Yojana कुक्कुटपालन योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट व्यक्तीसाठी विशेष शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देणे आहे. कुक्कुटपालना अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून चांगल्या प्रकारची शाश्वत उपजीविका व उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
Kukat Palan Yojana योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
सदर योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे.
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- लाभार्थ्याकडे असलेली मालमत्तेचा सातबारा किंवा आठ अ उतारा
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट साईजचा फोटो
- चालू मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन योजना अंतर्गत मिळणारा सबसिडी
कुकुट पालन करण्यासाठी शासनाकडून 25% पर्यंत अनुदान दिले जात आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी व एस सी एस टी वर्गातील लोकांना कुक्कुटपालनासाठी शासनाकडून 35% पर्यंत अनुदान दिले जाते.
📢 महत्वाची नोंद :- हे पण एकदा नक्की वाचा.
तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन विकास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयोगाची वाटल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींशी व नातेवाईकांशी नक्की शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.